इस्रायल-युएई शांतता कराराचा हवाला देत अध्यक्ष ट्रम्प यांचे नॉर्वेच्या अधिकाऱ्यानी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केले आहे. याबाबत नॉर्वेच्या संसदेचे सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी नोबेल कमिटीकडे अर्ज सादर केला असून यात  अध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायल-युएई यांच्या ऐतिहासिक शांतता कराराला अंतिम रूप देण्यास केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

 नॉर्वेच्या संसदेचे सदस्य क्रिश्चियन टायब्रिग-गेजेडे यांनी नोबेल कमिटीकडे सादर केलेल्या नामनिर्देशनात, इस्रायल-युएई शांतता करारासाठी अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना म्हटले आहे कि, या दोन राष्ट्रा मध्ये शांती निर्माण करण्यासाठी साठी केल्या गेलेल्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नामध्ये, अध्यक्ष ट्रम्प यांनी सर्वात अधिक प्रयत्न केले आहेत. ह्या करारा मुळे मध्य पूर्व देशातील इतर देश पण युएईच्या पावलावर पाऊल ठेवतील अशी अपेक्षा आहे. तसेच हा करार दिशा बदलणारा असू शकतो. ज्यामुळे मध्य पूर्व भाग सहकार आणि समृद्धीच्या क्षेत्रात बदलू शकतो

 टायब्रिंग-गजेडे हे संसदेत चार-टर्म सदस्य असून ते नाटोच्या संसदीय सभेत नॉर्वेच्या प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात.