अभिनेत्री कंगना राणावत हिने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसेना पक्षाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल रात्री नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवक यांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आज पुन्हा चितळे रोडवरील नेताजी सुभाष चौकात कंगना राणावतचा हिचा फोटो असलेल्या बॅनर जाळण्यात आला. यावेळी कंगनाच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली. आणी या पुढे कंगनाचा कुठलाही चित्रपट नगरला प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बोराटे हे उपस्थित होते.
आणखी बातम्या
एमएच सीईटी परीक्षा 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार ?
आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही.
अहमदनगर जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी पूर्ण.