2021 च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकन/ शिफारसीसाठी अंतिम तारीख आज (15 सप्टेंबर 2020) आहे. पद्म पुरस्कारासाठी नामांकन/ शिफारस केवळ पदम पुरस्कार पोर्टल https://padmaawards.gov.in. वर ऑनलाईन स्वीकारली जाईल.
           पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री हे पद्म पुरस्कार देशातल्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी आहेत. 1954 मध्ये सुरू करण्यात आलेले हे पुरस्कार दर वर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केले जातात. असामान्य कार्याचा गौरव करण्यासाठी दिले जाणारे हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग इत्यादी क्षेत्रातल्या अद्वितीय कामगिरीसाठी दिले जातात.कोणत्याही जाती, व्यवसाय, स्थानावरची कोणतीही व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र ठरू शकते. डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता सार्वजनिक उपक्रमांसह सरकारी नोकरदार पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही.
           पद्म पुरस्कार ‘जनतेचे पद्म पुरस्कार’ ठरावेत यासाठी सरकार कटीबद्ध आहे. यासाठी सर्व नागरिकांनी स्वतःसह नामांकन/शिफारस करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
           सर्व केंद्रीय मंत्रालये, विभाग, राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश, भारत रत्न आणि पद्म विभूषण पुरस्कार प्राप्त आणि सर्वोत्तम संस्था यांनी महिला, समाजातले दुर्बल घटक, अनुसूचित जाती- जमाती,दिव्यांग व्यक्ती यामधून तसेच समाजाची निस्वार्थ सेवा करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी समन्वित प्रयत्न करण्याची विनंती केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे.
           गृह मंत्रालयाच्या (www.mha.gov.in ) एडवार्ड्स आणि मेडल्स या नावाखाली अधिक माहिती उपलब्ध आहे. पुरस्काराशी संबंधित नियम संकेत स्थळावर https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx. या लिंकवर उपलब्ध आहे.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आठवड्यात रूग्ण संख्येत ४९९३ ने वाढ

करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून ४८००० रुपयांचा ऐवज लुटला

विदर्भातून विदेशात सहज होणार संत्र्याची निर्यात.

२० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची आजपर्यंतची प्रगती.