दि.१७/०९/२०२० रोजी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर महापालिका वार्ड क्रमांक ६ मध्ये, सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याबातात नगरसेविका श्रीमती पल्लवी दत्तात्रय जाधव यांनी माहिती दिली त्या म्हणाल्या, ‘अहमदनगर शहराचे महापौर माननीय श्री. बाबासाहेब वाकळे तसेच भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री. भैय्या गंधे यांच्या मार्गदर्शन नुसार दिनांक १४ ते २० सप्टेंबर असा हा सेवा सप्ताह चालणार असून यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी बुधवार दिनांक १६/०९/२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता वार्ड क्र ६ मधील नागरिकाना अर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क वाटप तसेच वृक्षारोपण आणि स्वच्छता अभिमान राबविण्यात येईल. कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता भाजप अहमदनगर चे सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, भाजपा नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार होईल.
           तसेच गुरुवार, दि. १७/०९/२०२० रोजी सकाळी ठीक १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सिद्धिविनायक मंदिर, सिद्धिविनायक कॉलनी, सावेडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जनकल्याण रक्तपेढी यांचे सहकार्य मिळाले असून या कार्यक्रमास प्रशानाने आखून दिलेल्या नियमानुसार स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे असे आव्हान अहमदनगर महापालिका भाजपा प्रभाग क्रमांक सहा नगरसेविका श्रीमती पल्लवी दत्तात्रय जाधव यांनी केले आहे.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आठवड्यात रूग्ण संख्येत ४९९३ ने वाढ

करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून ४८००० रुपयांचा ऐवज लुटला

पद्म पुरस्काराच्या ऑनलाईन शिफारशीसाठीची आज अंतिम तारीख.

लग्नासाठी नकार, गोळी झाडून आत्महत्याचा प्रयत्न.