भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार दि १६.०९.२०० ते १८.०९.२०२० या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. अशी महिती श्री. उदय किसवे प्र.निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
          आजपर्यंत अहमदनगर जिल्हयात ६२३.७ मि.मी तसेच १३९.१% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या) पर्जन्यमान झालेले आहे. सध्या दि.१५/०९/२०२० रोजी दुपारी १२.०० वा. अहमदनगर जिल्हयातून वाहणा-या प्रवरा नदीस ओझर बंधा-यातून ४१२ क्युसेक, गोदावरी नदीस नांदुरमधमेश्वर बंधा-यातून ३२२८ क्युसेक व जायकवाडी धरणातुन ४१९२ क्युसेक, मुळा धरणातुन मुळा नदीस २०००क्युसेक, सीना धरणातुन सिना नदीस ३६४क्युसेक, भिमा नदीस दौड पुल येथे ६८८१क्युसेक व घोड नदीस २९००क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
          जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे.
          तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे, नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते . त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या-या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रयाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो, धोकादायक सेल्फी काढू नये , मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांस केले आहे.
          आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष , जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र.१०७७ ( टोल फ्री ), ०२४१-२३२३८४४ वा २३५६९६० वर संपर्क साधावा.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर आज तब्बल १३६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून ४८००० रुपयांचा ऐवज लुटला

पद्म पुरस्काराच्या ऑनलाईन शिफारशीसाठीची आज अंतिम तारीख.

लग्नासाठी नकार, गोळी झाडून आत्महत्याचा प्रयत्न.