मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी ह्याबाबत पुढाकार घेऊन याबाबत मा. पंतप्रधानांना भेटून या प्रश्नाविषयी चर्चा करावी अशी विनंती भा.ज.पा. शिष्टमंडळाने खा. छत्रपती संभाजीमहाराज याना केली आहे.
मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हा प्रश्न समाजाच्या जिव्हाळ्याचा असल्याने आपण याबाबत लवकरच पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर समाजाच्या भावना घालाव्यात अशी विनंती केली. तसेच ह्या प्रश्ना बाबत सकारात्मक चर्चा होईल असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
भा.ज.पा. शिष्टमंडळात खासदार रक्षा खडसे, खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे ,खासदार डॉक्टर भारती पवार, खासदार डॉ हीना गावित,खासदार उन्मेष पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा समावेश होता.
आणखी बातम्या
अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ४४८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
अन्यथा सर्व महामार्गावर रास्तारोको – श्री. मनोज कोकाटे
रस्ते तातडीने दुरूस्त करा, अन्यथा काळे फासण्यात येईल ! महापौर वाकळे यांचा इशारा.