अहमदनगर येथील आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलच्या (एसीसीअँडएस) के. के. रेंज येथे लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची(एटीजीएम) यशस्वी चाचणी 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या चाचणी मध्ये 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्यावर अचुक मारा करण्यात आला. लेझर गाइडेड एटीजीमचा वापर हा लेझरच्या सहाय्याने लक्ष्य सुनिश्चित करणे आणि अचूक मारा करण्यासाठी होतो. हे क्षेपणास्त्र रणगाड्यांना नष्ट करण्यासाठी वापरले जाते. ते बहुपर्यायी क्षमतांसह विकसित केले गेले आहे आणि सध्या एमबीटी अर्जुन या रणगाड्याच्या तोफे मधून तांत्रिक मूल्यांकन चाचण्या सुरू आहेत.
          आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅबलिशमेंट (एआरडीई) पुणे यांनी हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. यासाठी हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरॅटरी (एचईएमआरएल) पुणे, इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (आयआरडीई) डेहराडून यांच्या सहकार्य लाभले.
           के के रेंज येथे एमबीटी अर्जूनच्या माध्यमातून झालेल्या लेझर गाइडेड अँटी टँक गाइडेड क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल डीडीआर अँड डी चे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष यांनीही डीआरडीओच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे ट्वीट करून अभिनंदन केले आहे.

Congratulations to @DRDO_India for successfully conducting test firing of Laser Guided Anti Tank Guided Missile from MBT Arjun at KK Ranges (ACC&S) in Ahmednagar.

India is proud of Team DRDO which is assiduously working towards reducing import dependency in the near future. pic.twitter.com/WuBivV7VYU

— Rajnath Singh (@rajnathsingh) September 23, 2020

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ९२३ बाधितांची भर.

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.

रस्‍ते तातडीने दुरूस्‍त करा, अन्यथा काळे फासण्‍यात येईल ! महापौर वाकळे यांचा इशारा.

विविध प्रश्नी मा. आ. रोहित पवार यांनी घेतल्या मंत्र्यांच्या भेटी.’