आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असून त्या निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर भारतीय जनता पार्टी, नगर शहरच्या वतीने सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक येथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. |
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री मा. श्री. विनोद तावडे., प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा प्रा. राम शिंदे, माजी खासदार दिलीपजी गांधी, शिर्डी साई बाबा संस्थान उपाध्यक्ष मा. आ. चंद्रशेखर कदम, महापौर मा. बाबासाहेब वाकळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, अहमदनगर जिल्हा भाजपा प्रभारी मनोज पांगरकर, भाजपा शहरजिल्हा अध्यक्ष मा. भैया गंधे, रा.स्व.सं. प्रांत संघचालक मा. नानासाहेब जाधव, देवळाली प्रवरा नगराध्यक्ष मा. सत्यजित कदम, मा. सुनिल रामदासी, मा. प्रसाद ढोकरीकर, मा. अभय आगरकर, नगरसेवक, नगरसेविका आणि भाजपा कार्यकर्ते हे उपस्थित होते. |
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षारोपण झाले यानंतर कोविड काळात सेवा करताना जे कार्यकर्ते, पदाधिकारी व मंत्री मृत्यूमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यातर्फे देण्यात आलेल्या ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमानंतर मा. श्री. विनोद तावडे यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय कोविड सेंटर येथे भेट दिली. तसेच आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्याठिकाणी रुग्णाची सेवा करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे विशेष अभिनंदन केले यावेळी कोवीड सेंटरचे पदाधिकारी, भाजपाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. |
आणखी बातम्या प्रदेश भाजपात कोणतेही मतभेद नाहीत, भाजपा हा एकसंघ आहे- मा. विनोद तावडे मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय. |