पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा फेटाळून लावली.’प्रदेश भाजपात कोणतेही मतभेद नाहीत,‘भाजपा हा एक संघ आहे. भाजपा मध्ये कुठलीही फळी नाही. राज्यात तसं कुठलंही वातावरण नाही, असं मत मा.विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या कृषि विधेयका वरील भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते म्हणाले ‘शरद पवार साहेब स्वतः कृषिमंत्री होते. पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण केवळ विरोधा साठी विरोध करणे अशी शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेत्यांची भुमिका ही सामान्य शेतकऱ्याला पटणारी नाही’.
मराठा आरक्षण बाबतीत बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले ‘मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर काही दिवसातच राज्य सरकार १८ हजार पोलीस भरतीचा निर्णय करते. त्यावरूनच सरकारची नियत काय आहे व सरकार मराठा समाजाला कसे डावलते आहे, हे दिसून येतंय’.
आणखी बातम्या
रयत विद्यार्थी परिषद यांचे पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत विविध मंजूर कामावर प्रश्नचिन्ह.
मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण.