महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांनी आज पदभाररे स्विकारला. परंतु पक्ष बदल याबाबत भाष्य करणे टाळले. सभापती पदाच्या माध्यमातून नगर शहर विकास करणे हे एकच उदिष्ट आहे असे त्यांनी सांगितले. त्यांच्या पदग्रहण समारंभास महापालिका विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते. तसेच, महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक राहुल कांबळे, मनोज दुलम, गणेश ननावरे, अजय चितळे यांनीही त्यांचे स्वागत केले.
           स्थायी समितीचे नवे सभापती नेमके कोणत्या पक्षाचे हा प्रश्न अनुत्तरीत असून निवडीच्या निमित्ताने झालेल्या राजकारणाचे पडसाद आता दिसु लागले आहेत. आजच भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी, सभापती कोतकर यांना पक्षाद्वारे नोटिस दिली असून. ३ दिवसाच्या आत खुलासा मागितला आहे.

आणखी बातम्या

निष्ठावंत शिवसैनिक मा. मंत्री अनिलभैय्या राठोड यांना श्रद्धांजली.

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना डिस्चार्ज तर ६०० बाधितांची रुग्णसंख्येत भर.

जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे- मा.हरिष जायभाये

काँग्रेसचे अध्यक्ष मा. सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.