MHT-CET २०२० परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षाकेंद्रे सुरु केली आहेत यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल हि परीक्षाकेंद्रे नगर शहर व्यतिरिक्त राहता, संगमनेर, कोपरगाव व श्रीगोंदे शहरात सुरू केली आहेत. याची महिती राज्याचे तंत्र शिक्षण राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट करून दिली आहे.
          त्यांनी ट्वीटर वर त्यांनी लिहले आहे, ‘यापूर्वी फक्त अहमदनगर शहरात केंद्र होते. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने यंदा अहमदनगर शहरासह राहता, संगमनेर, कोपरगाव व श्रीगोंदे शहरात देखील परीक्षाकेंद्रे सुरू केली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.’
           ‘परीक्षा केंद्रे वाढविल्यामुळे अहमदनगर शहरातील केंद्रांची क्षमता वाढली आहे. ४००० विद्यार्थ्यां व्यतिरिक्त अधिक १२००० मुलांची आपल्या जिल्ह्यातच परीक्षा देण्याची सोय झाली आहे. फक्त काही मुलांना पुणे शहरात परीक्षा द्यावी लागणार आहे.’

CET परीक्षेसाठी यापूर्वी फक्त अहमदनगर शहरात केंद्र होते. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने यंदा अहमदनगर शहरासह राहता, संगमनेर, कोपरगाव व श्रीगोंदे शहरात देखील परीक्षाकेंद्रे सुरू केली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) September 29, 2020

आणखी बातम्या

नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.

कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम

शेवगाव तालुक्यातील रांजनी गावातील ग्रामस्थांनी केली ग्रामसभेची मागणी.

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.