अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७९० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४२७८ इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५० आणि अँटीजेन चाचणीत ४०६ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, अकोले ०१, कर्जत ०७, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण २२, पारनेर १०, पाथर्डी १०, राहुरी ०२, शेवगाव ०८, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १५, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २५० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ६९,अकोले ०२, जामखेड ०३, कर्जत ०४, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ३३, नेवासा १६, पारनेर ११, पाथर्डी १२, राहाता १७, राहुरी १६, संगमनेर १०, शेवगाव १३, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४०६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २३, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ०१, नेवासा ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहाता ३४, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव २६, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १५ आणि कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज ८३४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १७५, अकोले ३६, जामखेड ४१, कर्जत ३१, कोपरगाव ४४, नगर ग्रामीण ८७, नेवासा ३०, पारनेर ४०, पाथर्डी ६३, राहाता ६५, राहुरी ५६, संगमनेर ५३, शेवगाव २३, श्रीगोंदा ३७, श्रीरामपूर २६, कॅंटोन्मेंट १३, मिलिटरी हॉस्पिटल १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: ३८३६५
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ४२७८
   मृत्यू: ७०६
   एकूण रूग्ण संख्या: ४३३४९

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आणखी बातम्या

MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे.

नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.

शेवगाव तालुक्यातील रांजनी गावातील ग्रामस्थांनी केली ग्रामसभेची मागणी.

कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम