प्रभाग क्रमांक ६ च्या भाजपा नगरसेविका श्रीमती.पल्लवी जाधव यांनी प्रभाग क्र.६, सुखकर्ता कॉलनी, सावेडी याठिकाणी भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी “सुखकर्ता कॉलनी” येथील नागरिकांनी त्यांना जाणवणा-या रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज इ. समस्यांबाबत नगरसेविका यांना निवेदन दिले
           नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सदर कॉलनीकडे येणारा एकही रस्ता सुस्थितीमध्ये नाही,. परिसरातील सांडपाणी व रस्ते गटार व्यवस्था कोलमडली असून सदर घाणपाणी सखल भागात साठुन राहते. रस्त्यावर पथदिवे नाहीत याचा फायदा घेऊन रस्त्यावर गैरप्रकार चालतात. आजुबाजुच्या रिकाम्या प्लॉट वर घाणीचे साम्रज्य पसरले आहे. बाजूच्या शाळेतील सांडपाणी रस्त्यावर सोडून दिले जाते.
           दि.२९/०९/२०२० रोजी मनपा पदाधिकारी व मनपा नगरसेविका यांनी सुखकर्ता कॉलनी सावेडी येथे समस्यांबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरात राहणारे नागरिक, महिला वर्ग व मनपा कर्मचारी हजर होते.

आणखी बातम्या

MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे.

नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.

शहरातील खड्डे, पाणी व ड्रेनेजलाईनचे नागरी प्रश्‍न सोडवावे -विनोद गायकवाड

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.